धमकी देऊन अल्पवयीन मुलीकडून मागवले अश्लील फोटो; त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): ऑनलाईन गेम खेळताना झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका भामट्याने तिच्या पालकांना सांगण्याची धमकी देऊन तिचे अश्लील फोटो मागवत मानसिक छळ केला. सततच्या त्रासाला वैतागून अखेर पीडित मुलीने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चौदावर्षीय पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये रोब्लॉक्स या
ऑनलाईन गेममधून आर्यन आत्रे या तरुणाशी ओळख झाली. ओळखींनंतर दोघात रोब्लॉक्सवर चॅटिंग सुरू झाली. त्यानंतर आर्यनने पीडितेला स्नॅपचॅटवर दोन खाती तयार करून त्याचे पासवर्डही तिला दिले. यानंतर या दोघांत स्नॅपचॅटवर चेंटिंग केली. मुलाने तिला व्हाट्सअॅप सुरू करण्यास सांगितले. मुलीने याला नकार दिल्यानंतर त्याने आई-वडिलांच्या फोन पे वरील सर्व पैसे काढून घेण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुलीने व्हाट्सअॅप सुरू केले. यावर सुमारे पंधरा दिवस चॅटिंग सुरू होती.
अश्लील छायाचित्रांची मागणी !
▶ मार्च २०२६ मध्ये आर्यनने पीडितेला तिचे अश्लील छायाचित्र पाठवण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने पुन्हा फोन पे वरील पैसे काढून घेण्याची धमकी काढून पाठविले. जुलै २०२६ पर्यंत आर्यन व्हॉट्सअॅप, व्हीडिओ, तर कधी व्हाईस रेकॉडॉगद्वारे चॅटिंग करीत होता.
पीडितेच्या आईलाही धमकी
▶ ५ ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेच्या आईला कॉल करून, तुमची मुलगी माझ्या भावासोबत चंटिंगग करते. त्यामुळे माझा भाऊ आत्महत्या करत होता. त्यानंतर पीडिता आणि आर्यन यांच्यातील चॅटींगचे स्क्रीनशॉट तिच्या आईला पाठवून ब्लॅकमेल केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे करीत आहेत.
चार इन्स्टाग्रामवरून चॅटिंग
▶ जुलैमध्ये आर्यनने पीडितेला विविध चार इन्स्टाग्राम अॅपवरून पीडित मुलीशी चेंटिंग केले. दरम्यान, आर्यनच्या इन्स्टाग्राम खात्यावरून आयांश ठाकरे आणि मुझमिल खान या नावानेही पीडितेशी चॅटिंग करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तुझ्या मम्मी-पप्पांना कॉल करून सांगेन, अशा धमक्या दिल्याचे देखील फिर्यादीत नमूद आहे.
https://epaper.san/warta.in/Powered By: Vrudhee Solutions












